सामाजिक न्याय व त्याबाबतच्या मिथ्यकथा
आरक्षणापासून नेमका फायदा कोणाला, तोटा कोणाला, यावर फार काही विश्वसनीय, अभ्यासातून सापडलेली माहिती नसते. या ‘माहितीच्या निर्वातात’च राजकीय हेतूंनी प्रेरित युक्तिवादाची भर पडते, आणि सर्वच वादविवाद ‘श्रद्धासदृश तत्त्वां’वर बेतले जातात. यावर उतारा म्हणून तीन अमेरिकास्थित अर्थशास्त्रज्ञांनी एका भारतीय प्रांतातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा १९९६ पासून मागोवा घेतला आहे प्रांताचे नाव मात्र जाहीर केलेले नाही. मुख्य लक्ष्य …